शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:48 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती.

ठळक मुद्देचालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरलाकशेडी घाटातील प्रकार, सहाजण ताब्यात

रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती.

या चोरीप्रकरणी एकाला पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी नाकाबंदी केली असता हे सर्व पकडले गेले. या घटनेतील संशयितांनी दुचाकी आणि ओमनी व्हॅनची चोरी करून महाबळेश्वर गाठल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये उघड झालीे.याप्रकरणी सुनील शंकर दामले (३५, साखरी, ता. गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या वळणापासून सुरू झालेल्या खड्ड्यांच्या महामार्गावरून अतिशय मंद गतीने वळणे पार करीत बस जात होती. मुंबई ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची आराम बस (एमएच ०८ ई ९४७५) रत्नागिरीकडे येत होती. या चालत्या आरामबसच्या डिकीतील सामानाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अशोक धर्मराज जाधव (४५, उंबरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याला ताब्यात घेतले होते.त्याने दिलेल्या माहितीनुसार हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व रा. खामकरवाडी, उंबरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या पाचजणांना ताब्यात घेतले आहे. सहाजणांना महाबळेश्वर पोलिसांकडून पोलादपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे. या सहाजणांमध्ये एकजण बालगुन्हेगार असल्याने त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे.वाहनांची चोरीधामणदिवीतील जंगलामधून ते भोगावच्या दिशेने गेले. कुडपण रस्त्यावर येऊन रानबाजिरे धरणाकडे येऊन तेथे एका ढाब्याजवळ थांबले. तेथे त्यांना दुचाकी आणि चारचाकी गाड्या दिसल्या. मात्र, चारचाकी गाड्यांना सेन्सर असल्याने त्यांनी आवाजाच्या भीतीने त्या चोरण्याचा प्रयत्न सोडला. कापडे येथे त्यांनी एक दुचाकी चोरली. त्यानंतर ते सर्वजण कापडे पेट्रोल पंपावर गेले. तेथे एका कामगाराची ओमनी व्हॅन चोरली.पळताना ताब्यातपेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ओमनी चोरी होऊनही त्यांचे वर्णन लक्षात आले नाही. त्यानंतर पाचजण महाबळेश्वर तपासणी नाक्यापर्यंत आले. तेथे ओमनी व्हॅनची झडती होण्याच्या शक्यतेमुळे ते व्हॅन तिथेच सोडून पळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांना पकडले. रात्रभर दरीखोऱ्यातून चालल्यामुळे त्यांचे पाय सोलले असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सर्व प्रकार सांगितला.धबधब्यावर केली सर्वांनी आंघोळपोलादपूर पोलिसांना दोन मोबाईल आढळून आले होते. त्यामध्ये या सर्वांचे धबधब्यावर आंघोळ करतानाचे फोटो होते. पोलिसांनी नजिकच्या पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यासाठी हे फोटो सर्वत्र व्हायरल केले. यानुसार दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर पोलिसांनी तपासणी नाक्याजवळ एका ओमनी व्हॅन सोडून निघून जाताना अटक केली.बॅगा चोरीलाया गुन्ह्यांत त्यांनी ८ प्रवाशांचे सुमारे २४ हजार ५०० रुपये किंमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तू, रोख रक्कम चोरली आहे. त्याचबरोबर गणपतीच्या सजावटीचे सामान असलेल्या बॅगा चोरीला गेल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरRatnagiriरत्नागिरी