रत्नागिरी : येणाऱ्या काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या वर्षात सहा ते सात एक्झिक्युटिव्ह लाउंज उभी करण्याचा आमचा निर्धार असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी सांगितले.कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात एक्झिक्युटिव्ह लाउंजचा शुभारंभ संताेषकुमार झा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमाला मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य वाणिज्य प्रबंधक राजेंद्र घोलप आणि कोकण रेल्वेचे विविध अधिकारी उपस्थित हाेते. या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये प्रवाशांच्या सुविधेकरिता २२ आरामदायी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी स्क्रीनवर प्रवाशांना मार्गावर धावणाऱ्या विविध रेल्वेच्या आगमन-निर्गमनची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवाशांकरिता येथे छोटेखानी कॅफेटेरिया सुविधाही असणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात चिपळूणपाठोपाठ एक्झिक्युटिव्ह लाउंज उपलब्ध असलेले खेड दुसरे स्थानक बनले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक्झिक्युटिव्ह लाउंज होणार : संतोषकुमार झा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:53 IST