शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत गुहागर तालुक्यात होणार राजकीय धमाका, भास्कर जाधवांना धक्का बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 18:30 IST

गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता

असगोली : गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. त्याचे परिणाम राज्यातील अनेक भागांत पाहायला मिळत आहेत. आता हीच राजकीय उलथापालथ आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघातही होणार आहे. दिवाळीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा असून, याबाबत मतदार संघातील उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.राज्यात ठाकरे - शिंदे गट असा वाद टोकाला गेला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत, तर आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात ठाकरे शिवसेनेची घडी बसविण्यासाठी आमदार भास्कर जाधव सगळीकडे मेळावे घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्याच मतदार संघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाशी जवळीक साधत आहेत.शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील सरपंच, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात सामील हाेण्याच्या तयारीत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांच्या माध्यमातून गुहागर मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल हाेणार आहेत. दिवाळीतच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हाेणार आहे. गुहागरात शिंदे गटांच्या बैठकाही हाेत असून, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या बैठकांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले जात आहे.गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनीही मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने गुहागरात दिवाळी राजकीय धमाका उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधव