लांजात बंद घर फोडून आठ हजाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST2021-06-26T04:22:41+5:302021-06-26T04:22:41+5:30

लांजा : बंद घरातून चोरट्याने रोख ८ हजार रुपये चोरुन नेल्याची घटना गुरुवारी लांजा तालुक्यातील कोट - सुतारवाडी येथे ...

Theft of Rs 8,000 by breaking into a closed house in Lanjat | लांजात बंद घर फोडून आठ हजाराची चोरी

लांजात बंद घर फोडून आठ हजाराची चोरी

लांजा : बंद घरातून चोरट्याने रोख ८ हजार रुपये चोरुन नेल्याची घटना गुरुवारी लांजा तालुक्यातील कोट - सुतारवाडी येथे उघडकीस आली. घरातील सर्वजण आपल्या आजारी नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोट - सुतारवाडी येथील कल्पेश प्रभाकर पांचाळ (३३) यांचा भाऊ प्रशांत यांची सासू आजारी असल्याने घरातील सर्वजण गुरुवारी दुपारी ३.३० वाजता घर बंद करून जाकादेवी येथे गेले होते. रात्री ८.१५ वाजता ते आपल्या घरी परत आले, त्यावेळी घराच्या मागील दरवाजाजवळच्या खिडकीचे ग्रील उचकटून ठेवलेले त्यांना दिसले. यावेळी शंका आल्याने त्यांनी घरात पाहणी केली. तेव्हा देवघरातील टेबलचा ड्रॉव्हर, बेडरूममधील टेबलचा ड्रॉव्हर तसेच पर्स अशा तीन ठिकाणी ठेवलेले एकूण ८ हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शुक्रवारी सकाळी कल्पेश पांचाळ यांनी या चोरीची तक्रार लांजा पोलीस स्थानकात दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, प्रथमेश वारिक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील सुनील पडळकर, पोलीस अंमलदार अविनाश भोसले, सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Theft of Rs 8,000 by breaking into a closed house in Lanjat