मोबाईल दुकानात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:53+5:302021-09-25T04:34:53+5:30

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील मोबाईलचे दुकान फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १ लाख ...

Theft in the mobile shop | मोबाईल दुकानात चाेरी

मोबाईल दुकानात चाेरी

googlenewsNext

रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथील मोबाईलचे दुकान फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याचा कालावधीत घडली.

याबाबत अल्ताफ सलीम विंधानी (२५, रा. राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी सायंकाळी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे नाचणे येथील शंखेश्वर प्लाझामध्ये ‘मोबाईल वर्ल्ड’ नावाचे दुकान आहे. ते अज्ञाताने फोडून रोख ४० हजार रुपये आणि १ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे मोबाईल असा एकूण १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करत आहेत.

Web Title: Theft in the mobile shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.