शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

महिलांनी एकत्र येऊन सुरू केले रत्नागिरीत राज्यातील पहिलेच सुपर मार्केट, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:24 IST

राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येणार

रत्नागिरी : तब्बल १६०० महिलांनी एकत्र येऊन प्रत्येकी पाच हजारांची देणगी देत रत्नागिरीत ग्राहक बाजार सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे राज्यातील पहिलेच सुपर मार्केट आहे. ही संकल्पना मुख्यमंत्र्यांना आवडली असून, राज्यात अन्यत्र ४०० ठिकाणी अशी सुपर मार्केट उभारण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.शुक्रवारी पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील निर्णयांची माहिती दिली. रत्नागिरीत सुरू झालेल्या बचत गटांच्या सुपर मार्केटला आता सरकारकडून आधार दिला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून महिला व बालकल्याण समितीसाठीच्या निधीतून दोन कोटी रुपये नगर परिषदेकडे वर्ग करत आहोत. नगर परिषद तीन कोटी रुपये देईल. या पाच कोटींमधून रत्नागिरीच्या आठवडा बाजारात एक संकुल उभे केले जाईल. जे सुपर मार्केट आता झाले आहे, त्याचे मॉलमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे. यात जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काची जागा मिळेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी १०० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. त्यातील ५० रत्नागिरीला तर, ५० रायगडला मिळतील. यातील रत्नागिरीला मिळालेल्या बसेसचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी मोठ्या गाड्या जात नाहीत. त्यामुळे ५० मिनी बसेस देण्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्याही महिन्याभरातच मिळतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.गेल्या काही काळात रत्नागिरी जिल्हा म्हणून तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोकनेते शामराव पेजे यांचे नाव दिले जाणार आहे. त्यांच्या नावाने राजकारण करणारे अनेक लोक आहेत. पण याबाबतचा निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतला नव्हता. तो आता झाला आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सामंत म्हणाले.

दापोली तालुक्यातील मुरूड येथे कुणबी समाजासाठी वसतिगृह उभारण्यासाठी सरकारने परतबोलीच्या अटीवर पाच कोटी रुपये दिले होते. वसतिगृहासाठी सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे काम रखडले होते. मात्र शिंदे सरकारने त्यासाठी सात कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तेही परतबोलीची अट रद्द करून देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. पैसे परत देण्याच्या अटीवर देण्याच्या मागच्या सरकारच्या निर्णयामागचे कारण काय, हे मात्र आपल्याला समजले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथे माजी मंत्री बाळासाहेब सावंत यांचे स्मारक करण्याचा निर्णय २०१५ साली झाला. त्यासाठी ३५ लाख रुपयांची गरज होती. त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक लोक मागच्या मंत्रिमंडळात होते. मात्र निधी मिळाला नाही. आता ते मंजूर झाले आहेत. महिन्याभरात त्याचा शुभारंभ होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

राऊत यांना महत्त्व देत नाहीवारिशे यांच्या हत्येचा कट रत्नागिरीत एका बंगल्यावर शिजल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रश्न करण्यात आला असता, मंत्री सामंत यांनी राऊत यांना मी महत्त्व देत नाही, असे सांगून विषय बदलला.‘ते’ २५ लाख रुपये आलेपत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र त्यातील २५ पैसेही सरकार देणार नाही, अशी टीका काही ठराविक लोकांकडून सुरू झाली होती. हे २५ लाख रुपये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. ते कसे अदा करावेत, याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे. मात्र पत्रकारांशीच चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेऊन ही मदत वारिशे कुटुंबाला लवकरच दिली जाईल, असे मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे