शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पाऊस साताऱ्यात, पाणी जगबुडीला; पाणी इशारा पातळीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:06 IST

प्रशासन ‘अलर्ट’

हर्षल शिराेडकरखेड : तालुक्यातील जगबुडी नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी पुन्हा इशारा पातळीवर पाेहाेचली हाेती. सातारा, महाबळेश्वर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली की, त्याचे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळते. त्यामुळे खेडमध्ये पावसाचा जाेर नसूनही पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी पावसाला सुरुवात झाल्यापासून नऊ दिवसा पाचव्यांदा जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर गेली आहे.खेड तालुक्याच्या पूर्वेला सातारा जिल्ह्याची सीमा असून, महाबळेश्वर तालुका सीमावर्ती भाग आहे. या भागात अतिवृष्टी झाल्यास जगबुडी नदीची पाणी पातळी वाढते. तसेच, सह्याद्री पर्वत रांगेत असणाऱ्या छोट्या नद्या, नाले या भागात मुसळधार पावसाने तुडुंब भरून वाहू लागले की, जगबुडी नदीचे पाणी काही तासांतच ५ मीटरपर्यंत पाेहाेचते. तालुक्यातील आंबवली, खोपी कशेडी घाट, कांदाटी खाेरे, रघुवीर घाट, वडगाव हातलाेट घाट या परिसरात पडणारा पाऊसही जगबुडीची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो.मंगळवारी सकाळी तुरळक पावसाच्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. नारंगी नदी व चोरद नदी परिसरातही पावसाचे प्रमाण नगण्य होते. मात्र, तरीही जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत होती. सातारा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात व तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात मंगळवारी काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे.

प्रशासन ‘अलर्ट’जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली की, नगर परिषद प्रशासन संभाव्य पुराचा धोका ओळखून ‘अलर्ट’ होते. जगबुडीने ६ मीटरच्यावर पाणी पातळी ओलांडली की, शहरात नगर परिषद प्रशासन भोंगा वाजवून नागरिकांना सूचना देते.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचनाजगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून, खोपी-शिरगाव परिसरातील डुबी नदी, चोरद नदी व नारंगी नदी यांची पाणी पातळी वाढली, तर काही तासांतच जगबुडी नदी धोका पातळी गाठते. त्यामुळे नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात.

पाचवेळा इशारा पातळीवरतारीख -पातळी (मीटरमध्ये)

  • १६ जून - ६.३०
  • १९ जून - ६.९०
  • २० जून - ५.८०
  • २१ जून - ५.००
  • २४ जून - ५.५०