शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘त्या’ मुलीचा इतका लळा लागलाय आमचा पायच निघत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:59 IST

पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जंगलमय भागात चार दिवस थंडीत राहिलेल्या त्या मुलीकडे पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. तिची ती अवस्था पाहून तिला उचलून घेण्याचेही धाडस हाेत नव्हते. आता तिची तब्बेतही सुधारली आहे. या मुलीचा आता इतका लळा लागला आहे की, तिच्या जवळून पायच निघत नाही, असे भावूक उद्गार रुग्णालयात तिची काळजी घेणारे पांगरी येथील ग्रामसेवक अखिलेश गमरे यांनी व्यक्त केले.संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील पऱ्याजवळील एका जंगलमय भागात २५ जानेवारी राेजी दीड वर्षाची मुलगी चार दिवस थंडीत कुडकुडत निपचित पडलेली आढळली. तिची अवस्था पाहून साऱ्यांच्याच डाेळ्यात पाणी आले हाेते.अखिलेश गमरे यांनी ग्रामस्थांसह खासगी वाहनाने तिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. या मुलीचे नाव अनुश्री असून,  तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अखिलेश यांनी तिच्याजवळ थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. रत्नागिरीतील कुवारबाव येथे अखिलेश हे पत्नी आणि आईसाेबत राहतात.मुलीला भेटण्यासाठी अनेकजण येत असल्याने तिला अजूनही अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आले आहे. तिला उपचारासाठी दाखल केल्यापासून अखिलेश आणि त्यांची पत्नी इरा त्या मुलीजवळ सकाळपासून थांबलेले असतात. रात्री १२-१२.३० वाजता ती झाेपल्यानंतर दाेघे घरी जातात. तिला जेवण देणे, तिला जे हवे ते बघण्याचे काम दाेघे करतात. पाेटच्या मुलीसारखी ते दाेघे तिची काळजी घेतात.अखिलेश यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयाने मला समजून घेतल्यानेच मुलीजवळ थांबणे शक्य झाले. आम्हाला आता तिचा इतका लळा लागला आहे की, तिच्याजवळून पायच निघत नाही. तिही आम्ही आल्याशिवाय जेवत नाही, असे अखिलेश यांनी सांगितले.

प्रेम मिळालेच नाहीया चिमुकलीला प्रेम कधी मिळालेच नाही. तिला घरात एकटीला ठेवून सगळे बाहेर जात हाेते. रुग्णालयातील साऱ्यांच्या प्रेमाने ती आनंदून गेली आहे. तिलाही सर्वांची आता सवय झाली आहे.

काेणताच त्रास नाहीया मुलीचा काेणताही त्रास नाही. अतिदक्षता विभागातील शांतता तिने कधीच भंग केली नाही. ती कधी रडली नाही. हाता-पायावर सलाईनच्या सुया टाेचल्या तरीही तिच्या ताेंडातून रडणे आलेले नाही. स्वत:च्या हाताने जेवते, रुमालाची घडीही अगदी व्यवस्थित करते.

मुलीला रुग्णालयात आणले त्यावेळी तिची प्रकृती चिंताजनक हाेती. ती बेशुद्ध हाेती, मानसिक धक्का बसला हाेता. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. बालराेगतज्ज्ञ डाॅ. राेहित पाटील यांच्यासह डाॅ. अभिषेक पाटील यांनी उपचार केले. ती बरी झाल्याचे पाहून खूप समाधान वाटते.  - डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी