शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थी आक्रमक, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले; गेल्या ३८ दिवसापासून आंदोलन सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 18:51 IST

दापाेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाविराेधात राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे. गेले ३८ दिवस हे ...

दापाेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाविराेधात राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे. गेले ३८ दिवस हे आंदाेलन सुरू असून, या आंदाेलनाची अद्याप दखल न घेतल्याने शुक्रवारी (३ मार्च) दापाेली काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून राेखले. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण झाले हाेते.महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनाची शासनाने दखल न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दापाेलीतील काेकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमाेरही विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे.कार्यालयाबाहेर बेमुदत आंदाेलनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून जाेरदार घाेषणाबाजी करत शासनाचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून राेखले. प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांना अडविण्यात आले.कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबवावे आणि या दोन्ही परीक्षांना तत्काळ स्थगिती द्यावी. राज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३पासून इतर शाखांच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण हाेत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षाuniversityविद्यापीठ