शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

मुस्लिम समाजाविरोधात आमदार नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच - रमेश कदम

By संदीप बांद्रे | Updated: December 14, 2023 16:15 IST

..तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल

चिपळूण : आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आम्ही नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून त्यांच्या पक्षाने व नेत्यांनी त्यांना समज देऊन रोखले पाहिजे, तसेच सरकारने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेश कदम यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.कदम पुढे म्हणाले की, पिढ्यानपिढ्या मुस्लिम समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे. कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू-मुस्लिम ऐक्याची एक मोठी परंपरा आहे. मग आमदार नितेश राणेंना गरळ ओकण्याची गरजच काय, नेमके त्यांना काय साद्य करायचे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिम समाज रस्त्यावर आला तर परत जाणार नाही, हे राणेंचे वक्तव्य म्हणजे धमकी नव्हे का, खुलेआम ते असे धमक्या देत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण सरकारने कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यांचा पक्ष व पक्ष नेते देखील याबाबत बोलत नाहीत. याचा अर्थ काय, भाजप आणि सरकार त्यांना पाठीशी घालून अशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाही ना, असा गंभीर आरोप देखील माजी आमदार कदम यांनी केला. असे वक्तव्य जर सातत्याने होत राहिले, तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल. मुस्लिम समाजच नव्हे तर कोणत्याही समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य होऊ नये...तर गीतेंना पाठिंबाअनंत गीतेंच्या उमेदवारी बाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले, राजकारणात काम करत असताना व्यक्ती मोठी नसते तर पक्ष मोठा असतो. त्यामुळे पक्षाने एखादा निर्णय घेतला तर कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन हे केलेच पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे आघाडी तर्फे जर लोकसभेची उमेदवारी अनंत गीतेंना मिळाली तर निश्चितपणे मी त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरेन. मी देखील रायगड मतदारसंघात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे अनंत गीतेंना त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले.       पक्षादेशाचे पालन करूचिपळूण संगमेश्वर मतदारसंघाबाबत देखील रमेश कदमांनी उघडपणे मत व्यक्त केले. या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. ती आमच्याकडेच असावी असा आमचा आग्रह असेलच. पण पक्ष नेतृत्वाने जर ही जागा अन्य पक्षाला दिली आणि तसा आदेश आला, तर निश्चितपणे पक्षाच्या आदेशाचे पालन करून त्या उमेदवाराला निवडून आणू. या जागेच्या बदल्यात कोणती जागा घ्यावी हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांचाच असेल, अशा शब्दात त्यांनी भूमिका जाहीर केली.

तो आघाडीचा फराळ गोडच होतादिवाळीत रमेश कदम आमदार भास्कर जाधव यांच्या घरी फराळासाठी गेले होते. पत्रकारांनी याबाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले, तो महाविकास आघाडीचा फराळ होता. त्यामुळे तो गोडच होता. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आमची आघाडी आहे. त्यामुळे एकत्र आलो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitesh Raneनीतेश राणे Ramesh Kadamरमेश कदमMuslimमुस्लीम