शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीस खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:27 IST

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा गुरुवार, ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. ...

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा गुरुवार, ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाच्या पाहणीदरम्यान ३ सप्टेंबरपूर्वी हा बोगदा वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ढिम्म प्रशासन व ठेकेदाराने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरवले आहे. त्यानंतर दोन दिवसांनी का होईना, आता गुरुवारपासून दोन्ही बोगद्यांतून वाहतुकीसाठी खुला होत आहे.मुंबईकडून गोव्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात येणारा हा कशेडी बोगदा गणेशोत्सव कालावधीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सव कालावधीत या बोगद्यातील तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू केली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्ड्यात गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणा प्रवास करावा लागणार होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश दिले होते. सद्य:स्थितीत दुसऱ्या बोगद्याच्या उर्वरित दोन अंतर्गत मार्गिका अपूर्ण असून एकाच मार्गिकेचा वापर वाहतुकीसाठी होणार आहे. दरम्यान या बोगद्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम अर्धवट असून खेड दिशेकडील मार्गांवर पुलांचे कामही अपूर्ण आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड