शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला, गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:47 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी हाेणार असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र, रायगड जिल्ह्यातील कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण असल्याने प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त टळला आहे.तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भुयारी मार्गाचा शुभारंभ दुहेरी रस्ता स्वरूपात करण्यात आला हाेता. अलीकडेच पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मध्यंतरी, कातळी-भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात आली होती.पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताकदिनी दुसऱ्या भुयारी मार्गातील वाहतुकीचा शुभारंभ करण्याच्या चर्चा सुरू झाल्या हाेत्या. मात्र, दुसऱ्या भुयारी मार्गाच्या आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. विद्युत प्रकाशझोताचे काम ८० टक्केच पूर्ण झाले आहे. दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत, व्हेंटिलेशनसाठी, तसेच भुयारामध्ये हवा खेळती राहण्यासाठी १० मोठ्या आकाराचे एक्झॉस्ट फॅन बसविण्यासाठी आणून भुयारामध्येच ठेवण्यात आले आहेत, दुसऱ्या भुयारी मार्गातही वरील बाजूच्या कातळामधून चार-पाच ठिकाणी पाण्याची संततधार सुरू आहे.

प्रजासत्ताकदिनी कातळी-भोगावच्या हद्दीतील कशेडी घाटाला पर्यायी दुसरा भुयारी मार्ग सुरू होणार नाही. भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गेल्याच महिन्यामध्ये बसविण्यात आलेले गर्डर आणि पिलर्स एकसंध होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. - पंकज गोसावी, अभियंता, मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्ग.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी