शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठे पांढरा हत्ती नाही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी - कृषिमंत्री अब्दुल सत्तार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:00 IST

कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाच्या जोरावर राज्याची उत्पादन क्षमता वाढली

दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठेशेतीला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन विकसित केलेल्या संशोधनामुळे राज्यातील कृषी क्षेत्राची भरभराट सुरू आहे. कृषी विद्यापीठे हा पांढरा हत्ती असल्याची टीका विरोधक करत असले तरी ती सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असल्याचे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.दापोली येथे ५० वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सयुंक्त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषद बुधवारी सुरू झाली. या दोन दिवशीय परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर मुख्य सचिव (कृषि) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषि शिक्षक व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणी, अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख उपस्थित होते.राज्याच्या विकासात कृषी विद्यापीठांचा मोलाचा वाटा असून, कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाच्या जोरावर राज्याची उत्पादन क्षमता वाढली आहे. तसेच कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शास्त्रज्ञांनी नवनवीन जाती, शेती अवजारे, सूक्ष्म सिंचन, कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्यामुळेच शेतकऱ्यांची वाटचाल भरभराटीकडे सुरू आहे. कृषी विद्यापीठांशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही, असेही मंत्री सत्तार म्हणाले.चारही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून येथे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात अवजारे, बी बियाणे प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती कृषिमंत्र्यांनी आवर्जून घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीuniversityविद्यापीठAbdul Sattarअब्दुल सत्तार