शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:16 IST

वेगवान सेवेसाठी स्पीड पोस्टचा ग्राहकांसाठी पर्याय

रत्नागिरी : पोस्ट खात्याची ब्रिटिश काळात म्हणजेच १७१ वर्षे सुरू असलेली रजिस्टर्ड एडी ही सेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचे संकेत पोस्ट खात्याने दिले आहेत. याऐवजी आता स्पीड सेवा ही एकच सेवा राहणार असून तिच्या नवीन दराबाबत येत्या आठ दिवसांत वरिष्ठ स्तरावरून कळविले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक अनंत सरंगले यांनी दिली. अधिक कार्यक्षम सेवेसाठी हा निर्णय पोस्ट खात्याने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.ब्रिटिश काळात पोस्टाची सेवा सुरू झाली. अगदी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचलेल्या पोस्टाने ग्रामीण जनतेशी आपली नाळ आताही कायम ठेवली आहे. सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्याने पोस्टाच्या तारसेवा, आंतर्देशीय पत्रे, साधे पोस्टकार्ड या सेवा बंद पडल्या. त्यांचा वापर अत्यंत कमी झाला. रजिस्टर्ड एडी ही सेवा मात्र आजही लोकप्रियता टिकवून आहे. या सेवेत टपाल पोहोचल्यानंतर घेणाऱ्याच्या सहीसह पोहोचदेखील मिळते. त्यामुळे रजिस्टर्ड एडी ही सेवा अत्यंत विश्वसनीय मानली जाते. शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही या सेवेचा वापर होत आहे.

बदलत्या काळानुसार आता पोस्टही हायटेक झाले आहे. आता तर बॅंकिग क्षेत्रातही पोस्टाने पदार्पण केले आहे. त्यामुळे वेगवान असलेल्या स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारून रजिस्टर्ड एडी ही सेवा दीर्घ काळानंतर पोस्टाने बंद करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे डाकघर अधीक्षक सरंगले यांनी सांगितले.स्पीड पोस्ट सेवेत ३५ किलो वजनापर्यंतचे पार्सल पाठविण्याची सोय आहे. टपाल पोहोचल्यानंतर मिळणारी पोहोच ही रजिस्टर्ड टपालाची सुविधा आता स्पीड पोस्टलाही दिली जाणार आहे. रजिस्टर्ड एडीपेक्षाही स्पीड पोस्ट सेवा वेगवान असल्याने ही सेवा बंद करून स्पीड पाेस्ट सेवा सुरू ठेवली जाणार आहे. मात्र, १७१ वर्षांची ही सेवा लोकप्रिय असतानाच बंद होणार आहे.

ट्रॅकिंगसाठी स्पीड पोस्ट

अधिक कार्यक्षम सेवेसाठी रजिस्टर सेवा बंद करून स्पीड पोस्ट सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टाकडून सांगितले जात आहे. स्पीड पोस्टद्वारे ग्राहकाला कमीत कमी वेळेत पार्सल पोहोचवता येणार आहे. टपाल पोहोचलेल्या ठिकाणाचे ‘ट्रॅकिंग’ही करता येणार आहे. रजिस्टर्ड टपाल सेवा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने ही सेवा ३० ऑगस्टपासून १७१ वर्षानंतर ग्राहकांचा निरोप घेणार आहे.