किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्याला रत्नागिरीत अटक
By मनोज मुळ्ये | Updated: May 27, 2023 13:03 IST2023-05-27T13:00:17+5:302023-05-27T13:03:08+5:30
गुलाम काझी असे त्याचे नाव आहे.

किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्याला रत्नागिरीत अटक
रत्नागिरी : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरुन धमकी देणार्याला रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील एकाला अटक करण्यात आली आहे. गुलाम काझी असे त्याचे नाव आहे.
काझी याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमय्या यांना धमकी दिली होती. त्याबाबत सोमय्या यांनी मुंबईतील साकीनाका पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार साकीनाका पोलिसांनी चांदेराई येथे येऊन गुलाम काझी याला अटक केली आहे. त्याला लगेचच मुंबईला नेण्यात आले असल्याचे समजते.
गेल्या काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.