शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पावसाच्या धारा झेलत रत्नागिरीकरांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना, १०० फुटी ध्वजस्तंभावर ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:31 IST

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली

रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज, शनिवारी (दि १३) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सूर्यवंशी, रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. त्यामुळे प्रांगण फुलून गेले होते.राष्ट्रध्वज वर जाताना उपस्थित रत्नागिरीकरांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला. सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने धरला होता. त्याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्याखाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र पाहायला मिळाले.यावेळी पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रीडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारीIndependence Dayस्वातंत्र्य दिन