शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पट दरवर्षी घसरतोय, तब्बल ८० शाळा झाल्या बंद

By मेहरून नाकाडे | Updated: July 19, 2025 19:40 IST

ग्रामीण भागातील शिक्षणाचे भवितव्य अधांतरी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील शिक्षणाचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषदशाळा आता संकटात सापडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या तब्बल ८ हजार ४०७ ने घटली आहे. तसेच ८० शाळा बंद पडल्या आहेत. पटसंख्येतील घसरण अशीच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षांत बहुतांश शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील कमी होणारी लोकसंख्या, खासगी शाळांचा वाढता प्रभाव, शहरांकडे होणारे स्थलांतर, गावातील सुविधांचा अभाव अशा विविध कारणामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घसरू लागली आहे. पूर्वी एका घरातून दोन किंवा तीन मुले शाळेत जाणारी होती; पण आता मात्र घरटी एकच मूल असते. त्याचा फटका ग्रामीण भागातील शाळांना बसला आहे. खेडेगावांमध्ये नोकरी, आरोग्य, वीज यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा अभाव असल्याने स्थलांतराचे प्रमाणही अधिक आहे.सन - शाळा - पटसंख्या २०२२-२३ - २,४६४ -  ६८,५७०२०२३- २४ - २,४२५- ६३९१०२०२४-२५ - २,३८४ - ६०,१२३

पटसंख्या घसरण्याची कारणेगावांकडे दुर्लक्षग्रामीण भागात रोजगाराची समस्या प्रमुख आहे. गावात कामधंदा मिळत नाही, शिवाय गावात आरोग्याच्या सुविधाही नाहीत. त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे.खासगी शाळांचा प्रभाव :ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे मुलांना शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात येत आहे. पाच हजार ते एक लाखापर्यंत शुल्क आकारणाऱ्या शाळांच्या देखण्या इमारती, आधुनिक सुविधा पालकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटत आहे.

शहराचे आकर्षण :अनेक पालक मुलांच्या शिक्षणासाठी शहरात स्थलांतरित होत आहेत. तर काही गावांतून व्हॅनद्वारे मुलांना शहरातील शाळेत पाठवीत आहेत.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा :जणगणना, निवडणूक ड्युटी, विविध सर्वेक्षणांची कामे अशा अनेक अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा शिकवण्यावरचा वेळ व लक्ष कमी झाल्याची तक्रार पालक करत आहेत.

शासकीय अनास्था :शासकीय शाळांमध्ये चांगले शिक्षक असल्यास काही काळ चांगली सुधारणा होते. मात्र, त्यांची बदली झाल्यास परिस्थिती पूर्वपदावर येते. हीच अस्थिरता पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास कमी करीत आहे.

सार्वजनिक सुविधांचा अभाव :अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अपुऱ्या वर्गखोल्या, जुन्या इमारती या समस्या आहेत.