शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या पुतण्याची होणार चौकशी, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By मनोज मुळ्ये | Updated: December 25, 2023 13:21 IST

अलिबाग लाचलुचपत प्रतिबंध खात्याची नोटीस

रत्नागिरी : उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडून चौकशी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांनाही लाचलचपत प्रतिबंध खात्याने चौकशीसाठी बोलावले आहे. आमदार साळवी यांचा मुलगा शुभम आणि दुर्गेश साळवे यांची भागीदारीमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामुळे ही चौकशी होणार आहे. आमदार साळवी यांच्या वहिनी अनुराधा साळवी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर किती मालमत्ता आहे, याची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ दीपक यांचीही चौकशी लाचलतपत प्रतिबंध खात्यामार्फत करण्यात आली आहे.आता या चौकशीचा पुढचा टप्पा म्हणून आमदार साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी यांना लाचलचपत प्रतिबंध खात्यामार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे.  आमदार साळवी यांचा मुलगा शुभम आणि दुर्गेश साळवी यांची भागीदारीमध्ये साळवी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्या अनुषंगाने ही चौकशी केली जाणार आहे. साळवी कन्स्ट्रक्शन कंपनीचे नोंदणीपत्र, त्यांच्या बँक खात्याचा तपशील तसेच आयकर विवरण पत्रासह २० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना लाचलचपत प्रतिबंध खात्याने केली होती. मात्र दुर्गेश साळवी त्या तारखेला हजर नसल्याने आता २७ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस लाचलचपत प्रतिबंध खात्याने दिली आहे.आमदार साळवी यांची वहिनी अनुराधा साळवी यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. अनुराधा साळवी आणि राजन साळवी यांची पत्नी अनुजा यांनी मिळून काही जमीन खरेदी केली आहे. त्याचे पैसे अनुराधा साळवी यांच्या बँक खात्यावरून देण्यात आले आहेत. या व्यवहाराच्या तपशीलासह अनुराधा साळवी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांनाही २० डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या हजर न राहिल्याने आता त्यांना २७ डिसेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग