शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर 'कोकण' अवतरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 17:57 IST

परशुराम घाटातील दुसरी लेन येत्या काही दिवसांत वाहतुकीस खुली केली जाणार

चिपळूण : मुंबई-गाेवा महामार्गावरील परशुराम घाटातील  दुसऱ्या लेनचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे अद्याप सुरु असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. परंतु आता परशुराम घाटातील उंचच उंच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोकणच्या निसर्ग सौंदर्य चित्रांद्वारे रेखाटले जात आहे. त्यामुळे घाटातून ये जा करणारे प्रवासी या चित्रांकडे आकर्षित होत आहेत.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली 17 वर्षे रखडले. ‘नकटीच्या लग्नात सतरा विघ्नं’ याप्रमाणे हे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. परशुराम घाटात तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच टेकडीवर आणि दरीच्या पायथ्याला नागरी वस्ती आहे. पावसाळ्यात दोन्ही बाजूने दरडी कोसळत असल्याने परशुराम घाटातील वाहतूक धोकादायक झाली होती. येथील डोंगर कटाईचे काम तीन ते चार वर्षे सुरू होते. तरीही हे काम सुरू असताना अपघात होऊन दोघांचा जीव गेला होता.परशुराम घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणचा कातळ फोडण्यातच बराचसा कालावधी निघून गेला. या ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेली दरड हटविण्याचे कामही अनेक दिवस सुरु होते. ही संपूर्ण दरड हटवून लगतच्या डोंगर कटाईचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर आता आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून परशुराम घाटातील दुसरी लेन येत्या काही दिवसांत वाहतुकीस खुली केली जाणार आहे.दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यापाठोपाठ आता संरक्षक भिंतीवर पेंटिंगद्वारे कोकणचा निसर्ग सौंदर्य रेखाटला जात आहे. समुद्र किनारा, किनाऱ्यावरील बोटी, भात शेती, नांगरणी, सुवार, मासेमारी अशा पद्धतीचे चित्र रेखाटून कोकणचा निसर्ग सौंदर्य संपुर्ण घाटात उभा केला जात आहे. मुंबईतील एका आर्ट एजन्सी मार्फत हे काम सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण