शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:40 IST

मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत.

रत्नागिरी : शासनाच्या बंदी आदेशानंतर गेले दोन महिने किनाऱ्यावर नांगरलेल्या मासेमारी नौका १ ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत. जिल्ह्यातील २,५६२ नौकांना मासेमारीसाठी मत्स्य खात्याकडून परवाने देण्यात आले असून, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज झाले आहेत.जून आणि जुलै हे महिने  माशांच्या प्रजननाचा आणि अंडी देण्याचा काळ असतो. या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोलसमुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते.  त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. मासेमारी बंदीच्या काळात नौकांच्या इंजिनाची देखभाल-दुरुस्ती व डागडुजी, नौकांची रंगरंगोटी करण्यात येते तसेच याच काळात जाळ्यांची दुरुस्ती व नवीन जाळ्यांची खरेदी मच्छिमारांकडून करण्यात आली आहे.रत्नागिरीतील मिरकरवाडा, राजीवडा, साखरतर, काळबादेवी, वरवडे, जयगड, राजापूर  तालुक्यातील साखरीनाटे, जैतापूर, आंबोळगड,  दापोलीतील हर्णै, दाभोळ, गुहागरमधील वेलदूर, पाजपंढरी, पडवे, मंडणगडातील बाणकोट आदी भागात मासेमारी केली जाते. या भागातील मच्छिमार आता मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत. मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच नौकांमध्ये डिझेल आणि बर्फाचा साठा करण्यात आला आहे. सध्या वातावरणही मासेमारीसाठी अनुकुल असल्याने नांगरून ठेवलेल्या नाैका आता समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

गतवर्षी वादळांचा फटकामागील मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला चक्रीवादळाने खोल समुद्रातील मासेमारीला ‘ब्रेक’ लागला होता. खवळलेल्या समुद्रामुळे  १५ ऑगस्टनंतरच मासेमारीला सुरुवात झाली होती. गतवर्षी वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामात मासेमारीसाठी चांगले वातावरण असल्याचे दिसत आहे.

पर्ससीननेट मासेमारी बंदचशासनाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून ट्रॉलिंग मासेमारी, गिलनेट आदी नौकांच्या मासेमारीला सुरू हाेणार आहे. मात्र, पर्ससीननेट मासेमारीवर बंदीच राहणार आहे. पर्ससीननेट मासेमारी एक महिना उशिराने म्हणजेच १ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहे. ही मासेमारी   ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या नौकांना अवघे चार महिने मासेमारी करता येणार आहे. मात्र, इतर मासेमारी नौकांप्रमाणेच  ३१ मेपर्यंत मासेमारी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी पर्ससीननेट मच्छिमारांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार