शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

By संदीप बांद्रे | Updated: December 2, 2022 19:29 IST

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

चिपळूण : जिल्ह्याला साडेसात वर्षानंतर विद्यमान सरकारमुळे स्थानिक पालकमंत्री मिळाला. पालकमंत्री या नात्याने एका दिवसात ३०० कोटीची कामे मंजूर करू शकलाे. मुख्यमंत्री आल्यास ते ३ हजार कोटीचा निधी देतील. हे गुवाहाटी दौऱ्याचे फलित असून, त्याचे फळ लवकरच जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने शुक्रवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी पालकमंत्री सामंत यांनी विविध विकास कामांसाठी सुमारे २०० कोटी निधीची घोषणा केली. चिपळुणात पूरपरिस्थिती न येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लाल व निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.नगर परिषदच्या बहाद्दूरशेख नाका येथील औद्योगिक वसाहतीत बचत गटाच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये, गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जागा संपादीत करण्यासाठी आवश्यक निधी, शहरातील रस्त्यासाठी नगरोत्थानमधून साडेचार कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.तसेच शिंदे - फडणवीस सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. चिपळूणवर पुराचे पुन्हा गंभीर संकट येऊ नये, यासाठी सत्ताधारी राज्यसरकार कटीबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे कामनाणार प्रकल्पाविषयी सुरुवातीला आपली व इतरांचीही भूमिका विरोधी होती हे मान्य आहे, पण थेट कायम स्वरूपी ७ हजार नोकऱ्या देणाऱ्या या प्रकल्पाला आता विरोध करून चालणार नाही. जिल्ह्यातील तरूणांना नोकऱ्या हव्या असतील तर येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही. प्रकल्प येण्यासाठी आता समर्थन करणाऱ्या संघर्ष समित्या स्थापन व्हायला हव्यात. मात्र, दुर्दैवाने सध्या जिल्ह्याबाहेरील लोक स्थानिकांची माथी भडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरा-घरात भांडणे लावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत. जिल्ह्यात प्रकल्प आले तरच जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguwahati-pcगौहती