राजापूर - ‘माझ्या पत्नीला भुताने उचलून नेऊन मारले,’ असा कांगावा करून तो मी नव्हेच, असे भासविणाऱ्या पतीनेच तिचा खून केल्याचे पुराव्यात उघड झाले. या खुनाच्या आराेपाखाली परिस्थितीजन्य पुराव्यांवर विश्वास ठेवत न्यायालयाने गजानन जगन्नाथ भोवड (४५, रा.परुळे, सुतारवाडी, ता.राजापूर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गजानन भोवड याने २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्नी सिद्धी हिला ‘तुला तुझ्या बहिणीकडे घेऊन जातो,’ असे सांगून परुळे, सुतारवाडी येथील जंगलमय ठिकाणी नेले. त्यानंतर, तिचे नाक आणि तोंड हाताने दाबून तिला जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तेथील गवतात लपवून ठेवला हाेता. त्यानंतर, आरोपीने पोलिसांना पत्नीच्या मरणाबाबत खोटी खबर दिली होती. त्याने आपल्या पत्नीला भुताने नेऊन मारल्याचा बनावही केला हाेता. त्याचे पत्नीचा खून केल्याचा पाेलिसांना संशय हाेता. त्यानुसार, भारतीय दंडविधान कलम ३०२, २०१ आणि १७७ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आराेपीला जन्मठेप खटल्यात डॉ.अजित गणपत पाटील, डॉ.विनोद चव्हाण, पंच सतीश शिंदे आणि मयत सिद्धीची बहीण सोनाली शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सत्र न्यायाधीश ओ.एम. आंबाळकर यांच्या न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद चालला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Web Summary : A man in Rajapur murdered his wife, claiming a ghost did it. The court, relying on circumstantial evidence, sentenced him to life imprisonment. He killed her and hid the body in the forest to destroy evidence.
Web Summary : राजापुर में एक व्यक्ति ने भूत की कहानी बनाकर पत्नी की हत्या कर दी। परिस्थितिजन्य साक्ष्यों के आधार पर अदालत ने उसे आजीवन कारावास की सजा सुनाई। उसने सबूत नष्ट करने के लिए जंगल में शव छुपा दिया।