शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:21 IST

काँग्रेस नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेना उधान

चिपळूण : राज्याचे मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना भेटणे म्हणजे पक्षांतर असे होत नाही. चिपळूणमधील काँग्रेस नगरसेवकांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट ही शहरातील समस्या व विकासासाठी होती. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. ते सर्वजण काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दात चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.चिपळूणमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण यांनी सोमवारी (२१ नाेव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. बांधकाम व्यावसायिक नासिर खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत प्रदीर्घ चर्चाही झाली. साहजिकच या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले.मात्र, ही भेट फक्त शहरातील विकासकामांसंदर्भात होती, असे त्या नगरसेवकांनीच स्पष्ट केले. तर आता काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनीही उघडपणे प्रतिक्रिया देत या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोणताही सामान्य माणूस भेटू शकतो. ते राज्याचे पालक आहेत. मुख्यमंत्री हे कोणत्या एका पक्षाचे नसतात, तर ते राज्याचे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येबाबत त्यांना भेटणे अजिबात गैर नाही, असेही लियाकत शहा यांनी सांगितले.चिपळूणमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे सत्य असले, तरी ते फक्त आणि फक्त चिपळूण शहरातील समस्या आणि विकासकामांबाबत भेटले आणि चर्चा केली. त्याचा अर्थ त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असा होत नाही. सुधीर शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण हे सर्वजण काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. यापूर्वी आलेल्या अनेक राजकीय वादळात ते काँग्रेसबरोबर ठाम राहिले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. ते कुठेही जाणार नाहीत, असा ठाम विश्वास लियाकत शहा यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेस