शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सेल्फीच्या नादात धबधब्यात बुडालेल्या तरूणाचा ३० तासांनी सापडला मृतदेह

By अरुण आडिवरेकर | Updated: June 2, 2023 14:12 IST

सौंदळ नजिक ओझरकोंड धबधब्यावर घडली होती दुर्घटना

राजापूर : तालुक्यातील सौंदळ नजिक ओझरकोंड धबधब्यावर सेल्फी काढताना पाय घसरून पडल्याने खोल डोहात बुडाल्याची घटना बुधवारी (३१ मे) राेजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली हाेती. निखिल मंगेश मोहिते (१८ रा. सौंदळ भालेकरवाडी, राजापूर) असे तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह तब्बल ३० तासांनी गुरूवारी (१ जून) रात्री ११ वाजता आढळला. आज, शुक्रवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सौंदळ येथील निखिल मंगेश मोहिते आणि त्याचे काही सहकारी मित्र हे परिसर पाहण्यासाठी बुधवारी सायंकाळी बाहेर पडले होते. फिरत फिरत ते सौंदळ नजिक ओझर कोंड येथील धबधब्यावर गेले हाेते. तिथे निखिलला उंचावरुन सेल्फी काढण्याची इच्छा झाली. त्यासाठी उंच खडकावर गेला. सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली धबधब्याच्या खोल डोहात कोसळला.

त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. बुडालेल्या निखिलचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हरना बाेलावण्यात आले. तहसीलदार शीतल पटेल, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनीही घटनास्थळी धाव घेत शोधकार्याचा आढावा घेतला.आमदार राजन साळवी, शिवसेना तालुकाप्रमुख अशफाक हाजू, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थांकडून त्याचा शाेध सुरूच हाेता. अखेर गुरूवारी रात्री ११ वाजता निखिलचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू