शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महायुतीचा बॅनर अन् शिंदेसेना गैरहजर

By मनोज मुळ्ये | Updated: April 18, 2024 12:38 IST

रत्नागिरी : महायुतीकडून अजून उमेदवार घोषित झालेला नसल्याने आणि भाजप आणि शिंदेसेना या दोघांनीही रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर ...

रत्नागिरी : महायुतीकडून अजून उमेदवार घोषित झालेला नसल्याने आणि भाजप आणि शिंदेसेना या दोघांनीही रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला असल्याने अजून तरी दोघांचा स्वतंत्र प्रचार सुरू आहे. महायुतीमधील भाजपने जागोजागी प्रचारसभा सुरू केल्या असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदेसेनेचा सहभाग अजूनही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाजपने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला असून, येथील उमेदवार कमळ या निशाणीवर लढणाराच असेल, असे अनेक भाजप नेत्यांनी वारंवार सांगितले आहे. भाजपकडून सुरुवातीपासून अनेक नावांची चर्चा झाली आणि आताच्या घडीला नारायण राणे यांचे नाव पुढे आहे. हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याने धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवण्यासाठी शिंदेसेना आग्रही आहे. शिंदेसेनेकडून सिंधुरत्न योजनेचे सदस्य, उद्योजक किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. दोन्ही पक्षांनी आपले दावे कायम ठेवले आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत, तरीही या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार आणि उमेदवार कोण असणार, याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलेली नाही.

घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ‘महायुतीचा मेळावा’ असेच बॅनर लावले जात आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील सभांमध्ये अजूनही शिंदेसेनेचा सहभाग दिसलेला नाही. महायुतीच्या व्यासपीठावर केवळ भाजपचेच नेते, पदाधिकारी दिसत आहेत. शिंदेसेनेचा प्रचारही स्वतंत्रपणेच सुरू आहे. त्यात भाजपचा सहभाग दिसत नाही.

उद्धवसेनेची नजरआपला प्रचार करताना उद्धवसेनेची नजर महायुतीच्या उमेदवारीकडे लागली आहे. महायुतीने अजून येथे कोणता पक्ष आणि उमेदवार लढणार, याची घोषणा केली नसल्याने महाविकास आघाडीने त्यावर टीकाही केली आहे. कोणता उमेदवार जाहीर झाला तर गणित सोपे आणि कोण उमेदवार भारी पडेल, याची गणितेही बांधली जात आहेत.

प्रचार स्वतंत्र, पण उल्लेख महायुतीचाभाजप आणि शिंदेसेना स्वतंत्रपणे प्रचार करत असले तरी प्रचार स्वतंत्र पक्षाचा किंवा उमेदवाराचा न करता महायुतीचाच केला जात आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारीवर अजून ठाम आहेत. किरण सामंत यांच्या मुंबईतील गाठीभेटी अजून सुरू आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना