शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

रत्नागिरीतील राहुल कळंबटे यांनी काढलेली बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक 

By शोभना कांबळे | Published: April 26, 2024 4:11 PM

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या ...

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या थ्रीडी रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे. राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली.राहुल कळंबटे यांनी अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत अगदी मोलमजुरी करून कलेचे शिक्षण घेतले. २०१० मध्ये अंशकालीन भरतीमध्ये कलाशिक्षक म्हणून नगरपरिषद शाळेत ६ महिने कंत्राटी काम मिळाले. शाळेत असतानाच त्यांनी संस्कार भारती रांगोळी याची सुरूवात केली. व्यक्तिचित्रण रांगोळी शिकायची खूप इच्छा होती. पण, यातील दिग्गजांनी रांगोळी शिकवण्यासाठी नकार दिला. एवढेच नव्हे तर ‘ तुला जमणार नाही’ असे सांगत निराशा केली. मात्र, रत्नागिरीतील कलाकार प्रशांत राजीवले आणि राजू भाताडे या समवयस्क रांगोळी कलाकारांनी त्यांना संधी दिली. त्यांच्यासोबत राहून राहुल कळंबटे रांगोळी काढायला लागले.त्याआधी ते कागदावर व्यक्तिचित्रण करत होते. पण, नंतर त्यांनी रांगोळीतून व्यक्तिचित्रण करायला सुरुवात केली आणि त्यातील थ्रीडी या अभिनव रांगोळीने त्यांना सांगली येथे राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यानंतर त्यांच्या हातून अनेक थ्रीडी रांगोळ्या साकार झाल्या. आतापर्यंत त्यांनी सुमारे बारा विविध व्यक्तींच्या थ्रीडी रांगोळ्या काढल्या. त्यात प्रत्यक्ष त्यांच्या मुलाचा देखील समावेश आहे.दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील सहकार नगर येथील राधाकृष्ण रेसिडेन्सीतील रहिवासी स्वरूप मिरजुळकर यांची मुलगी स्वर्णी हिच्या पहिल्या वाढदिनी राहुल कळंबटे यांनी अथक १७ तासांत तिचे थ्रीडी रांगोळीतून हुबेहूब चित्र साकार केले. या रांगोळीचे फोटो राज्यभरातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही व्हायरल झाले. त्यामुळे या थ्रीडी रांगोळीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.राजस्थान येथील २७ आर्ट पॉइंट संस्थेतर्फे ‘नववी नॅशनल ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशन २०२४’ स्पर्धा घेण्यात आली. यात देशातील ३५० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते. या स्पर्धेत रियलॅस्टिक पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग, फोटोग्राफी, प्रिंटमेकिंग, ऍब्सट्रेक पेंटिंग, पोट्रेट, स्कल्पचर, मिक्स मीडिया, डिजिटल पेंटिंग, रांगोळी या सर्व प्रकारांचा समावेश होता. त्यांचे फोटोग्राफ ऑनलाईन मागविण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी स्वर्णी हिच्या थ्रीडी रांगोळीचा फोटो स्पर्धेसाठी पाठविला. या थ्रीडी रांगोळीने या स्पर्धेतही बाजी मारत कळंबटे यांना देशात चौथा क्रमांक मिळवून दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी