टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:10 PM2020-09-28T17:10:55+5:302020-09-28T17:17:11+5:30

कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Thackeray's medicine was ridiculed by Vinay Natu as he did not want tope medicine | टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

Next
ठळक मुद्देटोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषधमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची विनय नातू यांनी उडविली खिल्ली

चिपळूण : कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकामुळे कोकणचा मोठा फायदा होणार असल्याची भूमिका डॉ. नातू यांनी स्पष्ट केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने कोकणातील कृषी क्षेत्राला उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय आंबा, काजू बागायतदार व मच्छी व्यवसायिकांचीही सर्व करांपासून सुटका होणार असून या विधेयकामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून आरोग्य जे काम करीत आहे, तेच काम आता ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमांतर्गत केले जात आहे. त्यातून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. तेच काम पुन्हा पुन्हा करावे लागत आहे. शिवाय तपासणी व सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याने केलेल्या कामाचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

Web Title: Thackeray's medicine was ridiculed by Vinay Natu as he did not want tope medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.