शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: शेट्येनगरातील भीषण स्फोट: मृत्युमुखी मायलेकींना दिला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:34 IST

मायलेकीचा झोपेतच अंत झाला

रत्नागिरी : शहरातील शेट्येनगर येथील भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकी, कनिज काझी आणि नुरुन्निसा अलजी यांच्यावर मजगाव येथील कब्रस्थान येथे बुधवारी रात्री साडे नऊ वाजता दफनविधी करण्यात आला.स्फोटात अशफाक काझी भीषण भाजले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले आहे. काझी यांच्या पत्नी कनिज व सासू नुरुन्निसा या झोपलेल्या असल्याने त्यांच्या अंगावर इमारतीचा स्लॅब कोसळल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. ढिगारा बाजूला काढून मृतदेह बाहेर काढल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.अशफाक यांचा मोठा मुलगा अरबाज नोकरीसाठी मुंबईत असतो. या दुर्घटनेची माहिती मिळताच तो तातडीने रत्नागिरीत आला. त्याने मृतदेह ताब्यात घेतले. मजगाव येथे अबरारचे आजोळ असून तेथे मामा, मावशी राहत असल्याने मृतदेह तेथे नेण्यात आले. रात्री साडे नऊ वाजता साश्रू नयनांनी दफनविधी करण्यात आला.

अश्रू अनावरसिलिंडरचा स्फोट झाला असून, बाबा भाजले आहे, एवढीच माहिती फोनवर मिळाली. मात्र, इकडे पोहोचल्यानंतरच चित्र काही वेगळेच होते. रात्री आई माझ्याशी शेवटची बोलली. माझ्या व अम्मारच्या शिक्षणासाठी तिने खूप कष्ट घेतले होते. आई, आजीबरोबर ज्या घरात आम्ही लहानाचे मोठे झालो, ते छत्रही राहिले नाही, असे सांगत अरबाजला अश्रू अनावर झाले. वडील व धाकट्या भावासाठी मी खंबीर होईन, एवढेच तो बोलू शकला.मायलेकीचे प्रेम अखेरपर्यंतमायलेकीचे नातेच दूधावरील सायीप्रमाणे घट्ट असते. कनिज यांच्या आई नुरुन्निसा सध्या लेकीकडे होत्या. दोघी मायलेकी बाजूलाच झोपल्या होत्या. झोपेतच त्यांचा अंत झाला. झोपेत दुर्घटनेची जाणीव कदाचित कनिज यांना झाली असावी, म्हणून त्यांनी आईला काही होऊ नये, अशा धास्तीने आईच्या पोटावर हात ठेवला होता. हा हात अखेरपर्यंत आईच्या पोटावर होता. मृतदेह ढिगाऱ्याखालून काढतानाचे ते चित्र गलबलून टाकणारे होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBlastस्फोटDeathमृत्यू