दूरसंचारची वातानुकूलन यंत्र अस्वच्छ
By Admin | Updated: July 15, 2014 00:16 IST2014-07-14T23:37:58+5:302014-07-15T00:16:48+5:30
यंत्रात बिघाड झाल्याचे कारण

दूरसंचारची वातानुकूलन यंत्र अस्वच्छ
शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन यंत्राची सुरक्षा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरम्यान, बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडल्यानंतर मात्र यंत्रे बिघडल्याची कारणे सांगितली जात असल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी शृंगारतळी येथे बीएसएनएलची थ्रीजी सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात इंटरनेटचा वेग वाढला आहे. मात्र, शृंगारतळी येथे बीएसएनएलव्यतिरीक्त टाटा डोकोमो, एअरटेल, आयडिया, वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या मोबाईल सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांपेक्षा उत्तम सेवा देण्यासाठी सरकारी सेवेला तत्पर राहण्याची गरज आहे. आगामी काळात आणखीन एक कंपनी मार्केटमध्ये उतरत आहे. एखादी नवीन कंपनी आली की, सरकारी ‘रेंज’ आपोआप गायब होण्यास सुरूवात होते.
बीएसएनएल सेवा बंद असल्याची विचारणा केल्यास यंत्रात बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बीएसएनएल शृृंंगारतळी दूरध्वनी केंद्राच्या वातानुकूलन महागड्या यंत्राच्या देखभाल व सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागात असलेल्या बीएसएनएलच्या सेवेबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. आता वातानुकूलन अस्वच्छ झाले. (वार्ताहर)