शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या सहीसाठी शिक्षकांचे पगार रखडले,शिक्षक संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:51 IST

Chiplun Teacher News- चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी लाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली आहे. मात्र, पगार बिलावर गटशिक्षणाधिकार्‍यांची सही झालेली नाही. गटशिक्षणाधिकार्‍याचा पदभार स्वीकारण्यास संबंधीत अधिकारी धजावत नसल्याने तालुक्यातील ११०० शिक्षकांचे पगार रखडले आहेत. यावरून तालुक्यातील शिक्षक संघटनाही आता आक्रमक झाल्या आहेत.

ठळक मुद्देलाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्यास नकार

चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी लाखोंची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली आहे. मात्र, पगार बिलावर गटशिक्षणाधिकार्‍यांची सही झालेली नाही. गटशिक्षणाधिकार्‍याचा पदभार स्वीकारण्यास संबंधीत अधिकारी धजावत नसल्याने तालुक्यातील ११०० शिक्षकांचे पगार रखडले आहेत. यावरून तालुक्यातील शिक्षक संघटनाही आता आक्रमक झाल्या आहेत.चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा खेळखंडोबा सुरू आहे. संबंधीत ५ विस्तार अधिकार्‍यांपैकी एकही अधिकारी गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यास तयार नाही. परिणामी ऑर्डर निघेल, याची गुप्त माहिती मिळताच अधिकारी रजेवर जाऊ लागले आहेत.

चिपळुणात गटशिक्षणाधिकारीच कार्यरत नसल्याने तालुक्यातील ११०० शिक्षकांचे पगार रखडले आहेत. पगारासाठीचा पंचायत समितीकडे निधी जमा झाला आहे. मात्र, शिक्षकांच्या पगार बिलावर गटशिक्षणाधिकार्‍यांची सही होत नसल्याने शिक्षकांच्या खात्यावर वेतन वर्ग करता येत नाही.विविध कामकाजासाठी शिक्षकांना लागणारे दाखलेही रखडले आहेत. तालुक्यातून येणार्‍या ग्रामस्थांच्या शंकांचेही निरसन होत नाही. गटशिक्षणाधिकारीच कार्यरत नसल्याने ग्रामस्थांच्या तक्रारींवर तोडगा काढता येत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला पट असूनही शिक्षकांची कमतरता आहे.

परिणामी अशा शाळेवर शिक्षकांची कामगिरी काढण्याची कामेही रखडत आहेत. अथवा त्यावर तोडगा निघत नाही. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या खुर्चीच्या खेळखंडोब्यामुळे फाईलींचा ढीग पडून आहे. येथील शिक्षण विभागाचा डोलारा मोठा आहे.

त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यरत नसल्याने शिक्षक, कर्मचार्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे शिक्षक संघटना आता आक्रमक झाल्या असून, यावर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर त्याचे परिणाम मुलांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzpजिल्हा परिषदChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीpanchayat samitiपंचायत समिती