लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:17+5:302021-09-10T04:38:17+5:30
हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे हातखंबा पंचक्रोशीतील ७५ वर्षांवरील निवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतरही त्यांच्याबद्दल असणारी ...

लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे शिक्षकांचा सन्मान
हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलतर्फे हातखंबा पंचक्रोशीतील ७५ वर्षांवरील निवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतरही त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यामध्ये हातखंबा येथील ७५ वर्षांवरील दोन निवृत्त शिक्षक लक्ष्मण कांबळे आणि बाळकृष्ण कांबळे यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी या दोन्ही शिक्षकांनी आपल्या कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर यांनी मनोगतातून दोघांचाही परिचय उपस्थितांना करून दिला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक विद्याधर कांबळे यांनाही क्लबतर्फे सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष मनोजकुमार खानविलकर, सचिव सैफुद्दिन पठाण, खजिनदार गिरीश शितप, उपाध्यक्ष संतोष गुरव, सहखजिनदार डॉ. अंकिता देसाई, मंगेश जाधव, मनस्वी जाधव, सचिन सावेकर, गौरी सावंत सावेकर, ॲड. अवधुत कळंबटे, सचिन शिंदे, शुभाली झगडे, प्रतीक कळंबटे, नेहा सुर्वे उपस्थित होते.