पित्रे महाविद्यालयात शिक्षकांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:06+5:302021-09-12T04:36:06+5:30

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रा. मंजुश्री भागवत, अक्षय भुवड, ...

Teacher shortage in Pitre College | पित्रे महाविद्यालयात शिक्षकांचा गाैरव

पित्रे महाविद्यालयात शिक्षकांचा गाैरव

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रा. मंजुश्री भागवत, अक्षय भुवड, प्रा. सुनील वैद्य यांना सन्मानित केले.

यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांची उपस्थिती होती. प्रा. मंजुश्री भागवत यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन २०२०-२०२१ मध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळवला, यासाठी सन्मानित करण्यात आले. अक्षय भुवड यांना कोरोना काळातील उत्कृष्ट कार्यालयीन कामकाजासाठी गौरविण्यात आले. प्रा. सुनील वैद्य यांनी अध्यापन कार्यासोबत कोरोना काळातील प्रवेश प्रक्रिया, परीक्षा व परीक्षांचे निकाल यासंबंधीच्या उत्कृष्ट संगणकीय कामकाजासाठी गौरविण्यात आले.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, शिरीष फाटक, राजेंद्र राजवाडे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, कार्यालयीन अधीक्षिका मीता भागवत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक हेमंत कदम आणि अमोल वेलणकर यांनी मेहनत घेतली.

110921\20210911_115242.jpg

फोटो-प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी प्रा. सौ.मंजुश्री भागवत, यांना सन्मानित केले सोबत पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे

Web Title: Teacher shortage in Pitre College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.