शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:51+5:302021-09-13T04:30:51+5:30
भेकरे यांची निवड खेड : तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भेकरे यांची बिनविरोध निवड ...

शिक्षकांचा सत्कार
भेकरे यांची निवड
खेड : तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भेकरे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच अंकुश काते यांनी अध्यक्षपदासाठी भेकरे यांचे नाव सूचित केले. त्यासाठी ग्रामसभेत सर्वानुमते अनुमती दर्शविण्यात आली.
भारत संचार निगम सेवा ठप्प
रत्नागिरी : तालुक्यातील पाली दूरध्वनी केंद्राच्या अखत्यारीतील पाली, वळके, कापडगाव, पाथरट, साठरेबांबर, कशेळी, खानू, मठ, निवसर परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. ग्राहकांनी तक्रार केली असता, चाैपदरीकरणामुळे ऑप्टिकल केबल तुटल्याचे उत्तर देण्यात येत आहे.
बसस्थानकात गैरसोय
रत्नागिरी : तालुक्यातील पाली बसस्थानक मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक आहे. बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचून जलाशयाचे स्वरूप आले. प्रवाशांना चिखल, पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. बसस्थानक, प्रसाधनगृहातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
अपघातचा धोका
देवरूख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महार्गावरील गोळवली येथील मोरी खचली असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. तोपर्यंत तातडीची उपाययोजना म्हणून सूचना फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे.