कशेडी घाटात टँकर घसरून अपघात; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:33+5:302021-09-03T04:33:33+5:30
खेड : अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या ...

कशेडी घाटात टँकर घसरून अपघात; चालक जखमी
खेड : अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमाराला कशेडी घाटात दरेकरवाडी येथे घडली. या अपघातात टँकरचालक महमद (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील घरडा केमिकल कंपनीत नाफ्ता घेऊन टँकर (एमएच ०४, जीआर १४९३) जात हाेता. कशेडी घाट उतरत असताना कशेडी घाटातील दरेकरवाडी येथील नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी चौकीचे सहायक पोलीस फौजदार बोंडकर, समेळ सुर्वे आणि सहकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासह मृत्युंजय दूत अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी चालक व क्लीनरला टँकरमधून बाहेर काढून उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.