रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

By Admin | Updated: June 6, 2014 00:14 IST2014-06-06T00:13:35+5:302014-06-06T00:14:07+5:30

प्रशासन विशेष लक्ष ठेवणार

Tangati sword on 16 villages in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याच्या तसेच दरडी कोसळणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत असल्याने यावर्षी अशा गावांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यात अशी १६ गावे असून, त्यात सर्वाधिक गावे दापोली तालुक्यात आहेत.
पावसाळा जवळ आला असल्याने जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तींचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये सर्व विभागप्रमुखांची बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आली आहे. यावेळी आपत्कालीन सर्व प्रकारच्या आपत्तींचा कसा सामना करावा, याची सविस्तर माहिती सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३५00 ते ४000 मिलिमीटर (१४0 ते १६0 इंच) इतका पाऊस पडतो. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेड या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर येण्याचे प्रकार सातत्याने घडतात. अतिवृष्टीमुळेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.
दरडग्रस्त म्हणून नोंंदल्या गेलेल्या १६ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, तशी आपत्ती उद्भवल्यास त्यासाठीही उपयायोजना करण्यात आली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील लोकांच्या स्थलांतराच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Tangati sword on 16 villages in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.