अपघाताप्रकरणी टेम्पाे ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:34 IST2021-04-28T04:34:03+5:302021-04-28T04:34:03+5:30

रत्नागिरी : बेदरकारपणे टेम्पो ट्रॅव्हल्स चालवून पुढील कारला पाठीमागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Tampa Travels driver charged in accident | अपघाताप्रकरणी टेम्पाे ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल

अपघाताप्रकरणी टेम्पाे ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे टेम्पो ट्रॅव्हल्स चालवून पुढील कारला पाठीमागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. २५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टीआरपी येथे घडली होती.

विनोद नाचणकर असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात आर्केश दयानंद नाईक (वय ३०, रा. नाणीज, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी ते आपल्या ताब्यातील आय-२० कार (एमएच ०६, आर ६४५५) मधून शीतल संतोष रसाळ (२८, रा. पाटबंधारे वसाहत, रत्नागिरी) हिला घेऊन जात होते. ते टीआरपी येथील टीव्हीएस शोरूमसमोर आले असता टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच ०८, ई ९०६१) त्यांच्या कारला मागून धडक दिली. परंतु हा अपघात आर्केशने अचानकपणे ब्रेक लावल्याने झाला असा समज करून विनोदने त्यांना शिवीगाळ करून अंगावर धावून गेला होता. अधिक तपास पोलीस नाईक सुर्वे करीत आहेत.

Web Title: Tampa Travels driver charged in accident