‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:43+5:302021-09-14T04:37:43+5:30
लांजा : सोशल मीडियावर महात्मा ज्योतिबा फुले यांनाही काही समाजकंटकांनी अश्लील भाषेत शिव्या दिल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ...

‘त्या’ समाजकंटकांवर कारवाई करा
लांजा
: सोशल मीडियावर महात्मा ज्योतिबा फुले यांनाही काही समाजकंटकांनी अश्लील भाषेत शिव्या दिल्या आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लांजा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.
महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेऊन समाजासाठी उपयुक्त असे काम केले आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी जे योगदान दिले आहे, त्यामुळे आज समाजामध्ये महिला ताठ मानेने जगत आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाचा काही समाजकंटकांना विसर पडला आहे. म्हणूनच सोशल मीडियावर महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत लिखाण करण्यात आले आहे. अशा समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा धावणे, संजय भुर्टे, माजी सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे उपस्थित होते.