शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार संजय राऊतांवरही कारवाई करा!, भाजप नेत्यांची मागणी

By सुधीर राणे | Updated: January 18, 2023 16:53 IST

टीकेच्या प्रकाराची प्रथम सुरुवात कोणी केली?

कणकवली:  केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे. कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेली म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या नेत्यांवर अपशब्द व पातळी सोडून टीका करण्यास परत सुरुवात केली आहे. त्याचा भाजपच्यावतीने आम्ही निषेध करतो. राऊत यांच्या टिकेला  प्रत्युत्तर दिल्यानंतर ठाकरे गट आता माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी करीत आहे. मात्र, या सर्व टीकेच्या प्रकाराची प्रथम सुरुवात कोणी केली? हे त्यांनी तपासण्याची गरज आहे. भाजपच्या नेत्यांवर टीका करायची, मुद्दामहून आरोप करायचे आणि मग प्रसिद्धीच्या झोतात राहायचे अशी संजय राऊत यांची सवय असल्याचा टोला देखील राजन तेली यांनी लगावला.ते म्हणाले,  राज्यातले वातावरण बिघडवण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ करावी. अशी मागणी देखील राजन तेली यांनी यावेळी केली.तसेच विनाकारण टीका करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.असेही राजन तेली यावेळी म्हणाले.जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रदेश स्तरावरून निर्णय!राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेऊन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसाच निर्णय प्रदेशस्तरावर राज्यातील पदांबाबत होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलायचे की त्यांनाही मुदतवाढ द्यायची याबाबतचा निर्णयही प्रदेशस्तरावर होईल असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल तसेच अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका मांडत कणकवली तालुका भाजपच्यावतीने पोलिस ठाण्यावर धडक देत  निवेदन सादर केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSanjay Rautसंजय राऊतRajan Teliराजन तेली BJPभाजपा