शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंदेव, नांदिवसेवासीयांचे उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित

By संदीप बांद्रे | Updated: October 3, 2023 17:08 IST

चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट, स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती येथील प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी ...

चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट, स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती येथील प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे सहायक धर्मादाय आयुक्तांकडे मागितली आहे. तसे पत्र उपोषणकर्त्या नांदिवसे ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी सोमवारपासून सुरू केलेले उपोषण मंगळवारी दुपारी तात्पुरते स्थगित केले. दरम्यान, मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीला देवस्थान कमिटी गैरहजर राहिली.ट्रस्टच्या विरोधात नांदिवसे, स्वयंदेव, राधानगरी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनासह सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारपासून चिपळूण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी देवस्थान ट्रस्ट आणि उपोषणकर्ते यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीला देवस्थान ट्रस्टपैकी कुणीही हजर राहिला नाही. परिणामी उपोषणकर्त्यांनी आपली बाजू मांडत जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा दिला.यावेळी प्रांताधिकारी यांनी देवस्थान ट्रस्टसंदर्भात प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने आवश्यक ती माहिती सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मागवून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. याबाबतचे पत्र उपाेषणकर्त्यांना दिल्यानंतर हे उपाेषण तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, बाबू साळवी, नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते उपस्थित होते

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलनChiplunचिपळुण