लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:59+5:302021-04-13T04:29:59+5:30

लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव यांची निवड हाेताच आमदार राजन साळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले. लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा ...

Swaroop Gurav as the Deputy Mayor of Lanza Nagar Panchayat | लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव

लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव

लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी स्वरूप गुरव यांची निवड हाेताच आमदार राजन साळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : शिवसेना युवा उपशहरप्रमुख व लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक स्वरूप गुरव यांची सोमवारी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीनंतर आमदार राजन साळवी यांनी स्वरूप गुरव यांचे अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, राजापूर सभापती प्रमिला कानडे, उपसभापती उन्नती वाघरे, माजी सभापती लीला घडशी, सुभाष गुरव, गटनेत्या पूर्वा मुळे, पाणी सभापती राजू हळदणकर, वैभव जोईल, प्रसाद भाईशेट्ये, बापू लांजेकर, सर्व नगरपंचायतीचे नगरसेवक, आजी - माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Swaroop Gurav as the Deputy Mayor of Lanza Nagar Panchayat