वक्तृत्व स्पर्धेत स्वराजराजे राशिनकर, ओम देवकर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:29+5:302021-08-22T04:34:29+5:30

गुहागर : शहरातील ज्ञानरश्मी सार्वजनिक वाचनालयातर्फे डाॅ. तानाजीराव चोरगे सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेतील प्राथमिक ...

Swarajraje Rashinkar, Om Deokar first in the oratory competition | वक्तृत्व स्पर्धेत स्वराजराजे राशिनकर, ओम देवकर प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत स्वराजराजे राशिनकर, ओम देवकर प्रथम

गुहागर : शहरातील ज्ञानरश्मी सार्वजनिक वाचनालयातर्फे डाॅ. तानाजीराव चोरगे सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेतील प्राथमिक गटात स्वराजराजे बाबासाहेब राशिनकर तर उच्च प्राथमिक गटात ओम दीपक देवकर याने प्रथम क्रमांक मिळवला.

प्राथमिक गटात हृदयेश प्रशांत साठले याने द्वितीय व अरणी राधेश्याम घाडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. उच्च प्राथमिक गटात भाग्यश्री दिलीप नाटुसकर हिने द्वितीय, साई प्रफुल्ल वायंगणकर याने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण विवेकानंद जोशी यांनी केले. ‘माझा आवडता नेता’ या विषयावर ही स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. स्पर्धेचे उद्घाटन ॲड. मंगेश जोगळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, साहिल आरेकर, गौरव पाटकर, रघुनाथ देवळेकर, बाबासाहेब राशिनकर, ईश्वर सलगरे, मनाली बावधनकर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सोनाली गाडे, श्यामली घाडे, अश्विनी जोशी यांनी मेहनत घेतली.

Web Title: Swarajraje Rashinkar, Om Deokar first in the oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.