आवाशी अपघातात गुणदे येथील जवान ठार
By Admin | Updated: September 18, 2014 23:25 IST2014-09-18T23:12:38+5:302014-09-18T23:25:19+5:30
शोककळा : एसटी- दुचाकीत अपघात

आवाशी अपघातात गुणदे येथील जवान ठार
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी फाटा येथे मोटारसायकल आणि एस.टी.बस यामध्ये झालेल्या अपघातात गुणदे (खेड) येथील एका जवानाचा मृत्यू झाला. हा लष्करी जवान सुटीत गावी आला होता. त्याच्या मृत्यूमुळे गुणदे गावावर शोककळा पसरली आहे. काल, बुधवारी रात्री अकरा वाजता हा अपघात झाला.विशाल शिवाजी खानविलकर (वय ३२) असे या जवानाचे नाव आहे. विशाल खानविलकर हा भारतीय लष्करात होता. तो रजा घेऊन गावी आला होता.