शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेत महिलेचा संशयास्पद मृत्यू, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 12:17 IST

रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला

चिपळूण : कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये लांजातील एका प्रवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२३ मार्च) दुपारी येथे घडली. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला असून, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.सावंतवाडी दिवा पॅसेंजर रेल्वेगाडीने मुंबईकडे ही महिला जात होती. प्रवासात संगमेश्वरदरम्यान अचानक तिच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर चिपळूणजवळ येताच अतिवेदना होऊ लागल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. चिपळूण रेल्वेस्थानकात गाडी पोहोचताच आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्या महिलेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावरून काही रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घालत रेल्वेच्या आरोग्य यंत्रणेवर आक्षेप घेतला. याचवेळी तेथे रेल्वेचे डॉ. शिरीष मदार पोहाेचले. त्यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला आहे. मात्र, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. परंतु, मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. या घटनेवेळी प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य न करता विनाकारण गोंधळ घातला. एवढेच नव्हे, तर रेल्वे पोलिसांनी बोलावलेली रुग्णवाहिका एका प्रवाशाने फोन लावून रद्द केली. -डाॅ. शिरीष मदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेDeathमृत्यू