लांजात प्राैढाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:36+5:302021-09-06T04:36:36+5:30

लांजा : घराच्या परिसरात काम करणाऱ्या मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजता लांजा येथे घडली. ...

Suspicious death of Lanjat Praidha | लांजात प्राैढाचा संशयास्पद मृत्यू

लांजात प्राैढाचा संशयास्पद मृत्यू

लांजा :

घराच्या परिसरात काम करणाऱ्या मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजता लांजा येथे घडली. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र कळू शकलेले नसून, वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. प्रदीप शिवगण (वय ४५, रा. कुर्णे, लांजा) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

लांजा शहरातील महेश नागले यांच्या घराच्या परिसरात काम करण्यासाठी प्रदीप शिवगण गेला होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान प्रदीप हा जोरदारपणे ओरडल्याचा आवाज आल्याने नागले यांच्या घरातील मंडळी धावत गेली. त्यावेळी प्रदीप हा बेशुद्धावस्थेत पडलेला होता. नगरसेवक राजू हळदणकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असतात डाॅक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केली. मात्र, प्रदीप याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. याबाबत लांजा पोलीस स्थानकात नाेंद करण्यात आली असून, लांजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Suspicious death of Lanjat Praidha