शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: समुद्रात एक संशयास्पद बार्ज दिसली, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:07 IST

फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात एक संशयास्पद बार्ज, टग आणि होडी दिसली

रत्नागिरी : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात एक संशयास्पद बार्ज, टग आणि होडी दिसली आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. परंतु, या बोटीचा मालक मुंबईतील असून, बोटीची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने इंजिन बंद पडले असल्याची माहिती पुढे आली आणि सर्वांनी नि:श्वास सोडला.बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीच्या कार्यालयातून पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाला याबाबत माहिती देण्यात आली. फिनोलेक्स जेटीसमोर एका अनोळखी बार्जसह एक टग बोट व एक छोटी होडी रनपार दिशेने जात असल्याचे स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी शिट्टी वाजवून इशारा दिला असता, संबंधित बोटीवरील व्यक्तींनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे सरकत समुद्रकिनारी रनपारनजीक अँकर टाकून बोट उभी केली.सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिस स्थानकाचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले. दुर्बिणीद्वारे पाहणी केल्यानंतर, बार्जवर ५ ते ६ अनोळखी इसम उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.ही बाब पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सुरक्षा शाखा रत्नागिरी, कस्टम अधिकारी गायकवाड, पोर्ट डिपार्टमेंट व कोस्टगार्ड यांना तातडीने कळविण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी १/३ शस्त्रधारी गार्ड समुद्रकिनारी तैनात करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी तत्काळ गार्ड नेमले व सतत पेट्रोलिंग सुरू केले.दरम्यान, कोस्ट गार्डच्या पल्लवी काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही घटना सांगण्यात आली. त्यांनी कोस्ट गार्डची बोट घटनास्थळी पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र, रात्री ८ वाजता हवामान खराब असल्याने बोट पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी कळविले. कोस्ट गार्डची बोट ५ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत फिनोलेक्स जेटीवर पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, पोलिसांचा बोटमालकाशी संपर्क झाल्याने बोटीची बॅटरी डिस्चार्ज होऊन इंजिन बंद पडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग