शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बदल्यांना स्थगिती; शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST

शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४७७ मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्याशिवाय शिक्षकांचे समुपदेशन न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षक बदल्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटना व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाने बदलीच्या रडारवर असलेल्या २२५ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर मुख्याध्यापक नियुक्तीसाठी प्रयत्न करतानाच १५ दिवसांमध्ये शिक्षणमंत्र्यांसमवेत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले आहे. यावेळी आमदांरासह शिक्षण सभापती विलास चाळके, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचमान्यता अपूर्ण असल्याने सहा महिन्यांनी पुन्हा बदल्यांची प्रक्रिया राबवावी लागणार आहे, असा मुद्दा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि बदल्या करु नयेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. संचमान्यतेनंतर मुख्याध्यापकांचे पदावनत करण्यात येऊन ते उपशिक्षक होणार आहेत. यामुळे बदल्यांची प्रक्रिया होऊन सेवा निवृत्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना अन्य तालुक्यात जाणे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे संचमान्यता पूर्ण होईपर्यंत समायोजन आणि समुपदेशन घेऊन बदल्या न करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यास शिक्षकांच्या बदल्यांची संख्या कमी होऊन जवळपास ती १०० होणार आहे. त्यामुळे समुपदेशनाला मिळालेल्या स्थगितीमुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. (शहर वार्ताहर)