राजापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हे निलंबन करण्यात आले आहे.
याबाबतचे प्रसिध्दीपत्रक मनसेचे राज्य सचिव सचिन मारुती मोरे यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
गेली आठ वर्षे राजेश पवार हे मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मनसेने काजिर्डासह चुनाकोळवण या ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. ओणीसह अन्य ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे सदस्य निवडून आले होते.
तरीही त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
या निलंबनाचे कारण या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेले नाही. मात्र कार्यकर्त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.