दुचाकी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:52+5:302021-06-22T04:21:52+5:30

चिपळूण : दुचाकी चोरीप्रकरणी चिपळूण पोलिसांनी खेर्डीतून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून ...

Suspect in bike theft case | दुचाकी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात

दुचाकी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात

चिपळूण : दुचाकी चोरीप्रकरणी चिपळूण पोलिसांनी खेर्डीतून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून काही दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिसांना संशयिताकडून आणखी दुचाकी जप्त करायच्या असल्यामुळे त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

सती चिंचघऱी येथे राहणारे संतोष दळवी यांची दुचाकी काही दिवसापूर्वी चोरीला गेली होती. दळवी यांच्या दुचाकीचा तपास करत असताना पोलिसांनी खेर्डीतील एकाला ताब्यात घेतले. यापूर्वी त्याने दुचाकींची चोरी केली होती. त्यामुळे संशयित म्हणून पोलिसांनी त्याला उचलले होते. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आठ दिवसापासून पोलीस संशयिताकडून दुचाकी जप्त करत आहेत. दोन दिवसात इतर दुचाकी मिळाल्यानंतर पोलीस संशयिताचे नाव जाहीर करणार आहेत.

Web Title: Suspect in bike theft case