‘लोकमत’चं ‘सरप्राईज गिफ्ट न विसरण्याजोगं

By Admin | Updated: July 7, 2016 00:39 IST2016-07-06T23:56:30+5:302016-07-07T00:39:32+5:30

वैष्णवी पवार : ‘संस्कारांचे मोती’ने वाचनाची आवड लावली अन् बरंच काही...!

Surprising gift of 'Lokmat' will not be forgotten | ‘लोकमत’चं ‘सरप्राईज गिफ्ट न विसरण्याजोगं

‘लोकमत’चं ‘सरप्राईज गिफ्ट न विसरण्याजोगं

आनंद त्रिपाठी-- वाटूळ --लोकमत आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत इयत्ता पाचवीपासून सातत्याने सहभागी होत होते. मला पियानोचं बक्षीस मिळालं, तेव्हा हे सरप्राईज गिफ्ट मला खूपच भावलं. आयुष्यात एवढं मोठं मिळालेलं बक्षीस मी कधीच विसरू शकणार नाही आणि नकळतपणे ‘लोकमत’ने मला वाचनाची आवडही लावली, ती ‘संस्कारांचे मोती’ची शिदोरी आहे, असे मत आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर)ची विद्यार्थिनी वैष्णवी धनंजय पवार हिने व्यक्त केले.
गेल्या वर्षी ‘लोकमत’ आयोजित संस्कारांचे मोती उपक्रमात वैष्णवीला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याबद्दल ती म्हणाली की, आजपर्यंत मी लोकमतच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतला. परंतु प्रमाणपत्र वगळता कोणतेही बक्षीस मिळत नव्हते. परंतु लोकमतमुळे वाचनाची गोडी मात्र लागली होती. गतवर्षी जुलैमध्ये सुरु झालेल्या संस्कारांचे मोती स्पर्धेत पुन्हा नव्याने सहभागी झाले. शाळेत स्पर्धेचा निकाल आला, आमचे शिक्षक आनंद त्रिपाठी यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मला स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे बक्षीस पियानो मिळाल्याचे जाहीर केले अन् माझा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रथमच मला एवढे चांगले बक्षीस मिळाले होते. ज्या बक्षिसाची अपेक्षा होती, तेच बक्षीस मला मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा तो पियानो घेऊन घरी जाते व आईला दाखवते ही उत्कंठा मनाला लागली होती, असे ती म्हणाली.
‘लोकमत’च्या स्पर्धेत हमखास बक्षीस मिळते, याची शाश्वती आईलाही आली. तिने लागलीच बाबांना ही आनंदाची बातमी सांगितली. लोकमतच्या स्पर्धेमुळे पेपर वाचनाची आवड निर्माण झाली. संस्कारांचे मोती या पानावर छापून येणाऱ्या वैविध्यपूर्ण माहितीचे संकलन करुन शाळेसाठी एक छान प्रकल्प तयार केला असून, त्या प्रकल्पाचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले. स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा स्पर्धा कधी सुरु होईल, याची उत्सुकता माझ्या मैत्रिणींनाही लागून राहिली होती, असे वैष्णवी म्हणाली.


शाळेतून घरी येत असताना वैष्णवीच्या हातात मोठी वस्तू पाहून मलाही उत्सुकता लागली. मला पाहताच वैष्णवी धावत आली व लोकमत स्पर्धेत पियानो मिळाल्याची गोड बातमी दिली. तिचा आनंद पाहून मलाही खूप भरुन आले. तिची जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी मी जवळून पाहात होते. न चुकता संध्याकाळी अभ्यासाबरोबरच पेपर वाचून कुपन चिकटविणे हा तिचा नित्यक्रम असे. मी गृहिणी असल्याने संस्कारांचे मोतीमधील विविध माहितीचे मोठ्याने वाचन करून ती मला ऐकवत असे. तिच्यामुळे मलाही पेपर वाचण्याची सवय निर्माण झाली.
- ममता धनंजय पवार, आई


मला मिळालेल्या पियानोचा उपयोग आम्ही शालेय परिपाठावेळी आमची प्रार्थना संगीतबद्ध करण्यासाठी करतो. पियानोच्या लयबध्द तालावर आमचा परिपाठ होत असतो. मला बक्षीस मिळाल्याचे माझ्या आई - बाबांनाही खूप कौतुक वाटते. त्यांनी मला ‘लोकमत’ स्पर्धेमध्ये यंदाही सहभागी होण्याची परवानगीही दिली आहे. सध्या आदर्श विद्यामंदिर, वाटूळ येथे इयत्ता आठवीत शिकत असलेल्या वैष्णवीला पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा आहे.
- वैष्णवी धनंजय पवार,
आदर्श विद्यामंदिर, वाटूळ

Web Title: Surprising gift of 'Lokmat' will not be forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.