शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:12 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे मातोश्रीवर घिरट्या मारत होते अनंत गीते यांचा चिपळूण येथील सभेत गौप्यस्फोट

चिपळूण : लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी भाजप व त्यानंतर सेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा मातोश्रीवर घिरट्याही मारल्या.  शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी ते खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला.गुहागर व चिपळूण मतदारसंघाच्या सीमेवर असलेल्या कोंढे येथील रिगल महाविद्यालयाच्या सभागृहात भास्कर जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेतर्फे गुरूवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली.ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे खासदार तटकरे यांनी आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अंतिम स्वरूपातील चर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी केली होती. त्या भेटीतील शब्दन्शब्द आपल्याला माहीत असल्याचेही गीते यांनी यावेळी सांगितले.गीते यांनी पुढे सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आमच्या पक्षात डागी माणसे घेत नाहीत, असे सुनावले होते. त्यानंतर ते मातोेश्रीवर घिरट्या मारत होते. शेवटपर्यंत त्यांना मातोश्रीत प्रवेश मिळाला नाही.

अखेरच्या क्षणी त्यांनी आपली कन्या आदिती तटकरे हिच्यासाठी शिवससेनेकडे तिकीट मागितले होते. मला नाहीतर तिलातरी तिकीट द्या, असे तटकरेंनी सांगितल्याचे गीते यांनी यावेळी सांगितले. पण तेही मिळाले नसल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. आता राष्ट्रवादी पक्ष संपत चालला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी गुहागरचे उमेदवार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख संदीप सावंत, आरपीआयचे एम. बंदुकवाले, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे, उद्योजक वसंत उदेग, मोहन आंब्रे, पंचायत समिती उपसभापती शरद शिगवण उपस्थित होते.

टॅग्स :ratnagiri-acरत्नागिरीAnant Geeteअनंत गीतेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sunil tatkareसुनील तटकरे